breaking-newsराष्ट्रिय

“…तर सोनिया गांधी-राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द होईल, अमित शाहांच्या टेबलवर फाईल”

दिल्ली | महाईन्यूज

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं भारतीय नागरिक्तत्व लवरकरच रद्द होईल, असा दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. २० फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील एका जाहीर कार्यक्रमात स्वामी यांनी हे वक्तव्य केलं आहे. एका स्थानीक वृत्तमान पत्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हैदराबाद विद्यापीठात “CAA – a historical imperative beyond contemporary politics” या विषयावर स्वामी बोलत होते. आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (एबीव्हीपी) हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना स्वामी यांनी भारतीय संविधानाचा हवाला देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं असं म्हटलेय.

अमित शाहांच्या टेबलवर फाईल –
स्वामी म्हणाले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाची फाईल सोनिया गांधी यांच्या टेबलवर आहे. लवकरच त्यांना नागरिकत्व गमावावं लागले आहे.

संविधानाचा हवाला –
यावेळी बोलताना स्वामी यांनी भारतीय संविधानाचा हवाला देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नागरिक्तव गमावावं लागेलं असा दावा केला. ते म्हणाले की, भारतीय असताना इतर देशाचं नागरिकत्व घेतात, त्यांचं नागरिक्तव रद्द होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button