ड्रायव्हरने बलात्कार केल्यानंतर चीनमधील सर्वात मोठी कॅबसेवा बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/china-national-flag-6.png)
पीएचिंग (चीन) – महिलेवरील बलात्कारानंतर चीनमधील सर्वात मोठी कॅबसेवा बंद करण्यात आली आहे. आपल्या एका ड्रायव्हरने महिला प्रवाशावर बलात्कार केल्यानंतर चीनमधील सर्वात मोठी कॅबसेवा देणाऱ्या डीडी चुक्सिंग या कंपनीने ड्रायव्हरच्या कृत्याबद्दल क्षमायाचना तर केलीच आहे, पण एका आठवड्यासाठी आपली संपूर्ण सेवा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार आपले संपूर्ण कामकाज बंद ठेवून डीडी चुक्सिंग कंपनी आपल्या प्रणालीचा पुनरावलोकन करणार आहे. त्यात काय सुधारणा करता येतील हे पाहणार आहे. बलात्कार करून फरारी झालेल्या ड्रायव्हरची माहिती देणारास कंपनीने दहा लाख युआन म्हणजे सुमारे 1 कोटी 6 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
चीनमधील हेनान प्रांतात ही बलात्काराची घटना घडली होती. 5 मे रोजी डीडी चुक्सिंग कंपनीच्या एका कॅब ड्रायव्हरने आपल्या महिला प्रवाशावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. हे कृत्य केल्यानंतर ड्रायव्हर फरारी झाला आहे. या घटनेने कंपनीच्या विश्वसनीयतेवरच प्रश्नचिंन्ह निर्माण झाले आहे.सोधल नेटवर्कवर या संबंधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.