डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किमतीत निच्चांकी विक्रमी घसरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/money-2000.jpg)
नवी दिल्ली – डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किमतीत घसरण झाली आहे. सध्या रुपयाची डॉलरप्रति किमतीने निच्चांकी विक्रम केला असून एका डॉलरच्या तुलनेत ७३. ३३ असा झाली आहे. काही तासांपूर्वी रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी होती. मागील काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किमतीत कमालीची घसरण होत आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने डॉलरच्या प्रति रुपयाच्या किमती सुधारण्यासाठी आहे परंतु, करण्यात आलेल्या उपायांचे अजूनही फळ दिसत नाही.
सप्टेंबरमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत होत असलेली वाढ आणि रुपयांची घसरण यामुळे राज्यांच्या तिजोरीवर अतिरिकीय ताण येणार आहे. राज्यांचे वार्षिक आर्थिक बजेट मध्ये २२,७०० कोटीच्यावर अप्रत्यक्ष कर असेल. याचा मोठा फटका काही मुख्य राज्यांना जास्त लागणार असून त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल.
अंतर बँक विदेशी विनियम बाजारमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण आपल्या सार्वकालीन निच्चांकी स्तरावर झाली. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली असून तो ७८ डॉलर प्रति बॅरेलच्या पुढे सरकला आहे. याचा मुंबई शेअर बाजारावर देखील परिणाम दिसून आला. येथे शेअर बाजारात देखील थोडी घसरण दिसून आली.
खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत निरंतर सुरू असलेली वाढ तसेच चीन-अमेरिका या महासत्तांमध्ये चाललेले व्यापारयुद्ध याचे चलन बाजारात नकारात्मक पडसाद उमटत आहेत. याचा रुपयाच्या मूल्यावर ताण पडलेला दिसून येतो. इंधन आयात खर्चात मोठया वाढीने देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढून अर्थव्यवस्थेला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, ही चिंता लागून आहे.