breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांच्य माजी प्रचार प्रमुखांना तुरुंगवास

  • पुराव्यात छेडछाडीचा आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या एका माजी प्रचार प्रमुखांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पुराव्यात छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ट्रम्प यांचे माजी प्रचार प्रमुख पॉल मॅनफोर्ड यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार आहे. पॉल मॅनफोर्ड हे गेली अनेक वर्षे रिपब्लिकन पक्षासाठी काम करत आहेत. सन 2016 मध्ये रिपब्लिकन पक्षासाठी प्रचार प्रमुख म्हणून काम करणारे मॅनफोर्ड राष्ट्रपती निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाचा तपास करणाऱ्या विशेष अधिवक्ते रॉबर्ट म्युलर यांच्या निशाण्यावरच होते.

त्यांच्यावर वित्तीय गडबडीच आरोप असून त्यांच्यावरील आरोपांमध्ये काळे धने सफेद करणे आणि अमेरिकेला धोका देणे हे आरोप मुख्य आहेत. हे आरोप सिद्ध न झाल्याने ते व्हर्जिनिया येथील त्यांच्या घरात नजरकैदेत होते. रॉबर्ट म्युलर यांनी त्यांच्यावर आता पुराव्यात छेडछाड करणंयाचे आरोप केलेले आहेत. अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश आर्मी बॅर्मन जॅक्‍सन यांनी मॅनफोर्ड यांचा जामीन रद्द करून तुरुंगवास ठोठावला आहे.असे करण्याची माझी इच्छा नव्हती, परंतु मी डोळे बंद करून गप्प बसू शकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button