breaking-newsराष्ट्रिय

टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून अमित शहांच्या ताफ्यावर दगडफेक

हैदराबाद : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. एनडीएतून बाहेर पडलेल्या तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, ही मागणी करत ताफ्यावर दगडफेक केली. तसेच यावेळी ‘अमित शहा गो बॅक’च्या घोषणाही देण्यात आल्या.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होते. मात्र चार वर्षांत आश्वासन पूर्ण न केल्याने टीडीपी एनडीएतून बाहेर पडला आहे. यामुळे आज अमित शहा यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन रेनीगुंटा विमानतळाकडे जात असताना टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यामध्ये ताफ्यातील एका कारच्या काचा फुटल्या आहेत. परंतु अमित शहा यांच्या गाडीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान कार्यकर्त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. यापुढे अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा टीडीपीचे अध्यक्ष व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button