breaking-newsआंतरराष्टीय

टिकटॉक अँपचे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा

बीजिंग – अमेरिकेकडून मालमत्ता विक्रीचा दबाव वाढत असताना आज जगप्रसिद्ध टिकटॉक अँप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी चार महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी निवेदन प्रसिद्ध करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. जून महिन्यात त्यांनी टिकटॉकच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

आता मेयर यांच्या जागी जनरल मॅनेजर व्हेनेसा हंगामी सीईओ म्हणून काम पाहणार आहेत. राजीनामा देताना कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या एक पत्रात मेयर म्हटले आहे की, “खूप जड अंतकरणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे”. दरम्यान, भारताकडून बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टिकटॉकवर बंदी आणण्याच्या निर्णय प्रक्रियेला वेग दिला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या आदेशात टिकटॉकला अमेरिकेतील व्यवहार सुरु ठेवायचा असेल तर त्यांना ९० दिवसांत विक्री करावी लागेल आणि सर्व उपलब्ध डाटा डिलीट करावा लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर टिकटॉक कंपनीने ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला होता. अशा परिस्थितीत आज अखेर टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button