breaking-newsटेक -तंत्र

जीमेलचं सर्व्हर डाऊन, फाईल्स शेअरिंग खोळंबले

संदेशवहनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे गुगल जीमेल आज ठप्प झाले होते. म्हणजेच जीमेलचे सर्व्हर डाऊन झालं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. ईमेल पाठवताना अटॅचमेंट फेल होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावरून आल्या आहेत.

जीेमेलमधून आपण अटॅचमेंट पाठवू शकतो. त्यामुळे अटॅचमेंट पाठवताना मेल फेल होत आहेत. तसेच, गुगल ड्राइव्हमध्येही युजर्सना समस्या जाणवत आहेत. वापरकर्त्यांना फाइल शेअर करणं, तसंच अपलोड आणि डाउनलोड करणंही कठीण जात आहे. युजर्सनी याबाबत ट्विटर आणि डाउनडिटेक्टर वेबसाइटवर तक्रार केल्यानंतर आता गुगलनेही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुगल अ‍ॅप्स स्टेटस पेज’वर याबाबत माहिती देताना, जीमेलमध्ये समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून लवकरात लवकर समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं गुगलने म्हटलं आहे.

भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, जपान आणि युरोपमधील काही भागांमध्ये युजर्सना ही समस्या जाणवत असल्याचं समजतंय. डाउनडिटेक्टरनुसार, भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजेपासून युजर्सना जीमेलमध्ये समस्या जाणवायला सुरूवात झाली.

ई-मेल पाठवताना आणि फाइल्स अटॅच करताना बहुतांश युजर्सना अडचणी येत आहेत. काही युजर्स गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक यांसारख्या G suite सेवा वापरतानाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. पण, सर्वाधिक समस्या जीमेल वापरणाऱ्यांना होत आहे. जगभरात लाखो लोकं जीमेलचा वापर करतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button