जागतिक हिंदी संमेलनासाठी प्रा. चंद्रदेव कवडे यांची निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/kavde-.jpg)
नवी दिल्ली – हैद्राबाद स्थित हिंदी प्रचार सभेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे सुपूत्र प्रा.चंद्रदेव कवडे यांची मॉरीशस येथील 11व्या जागतिक हिंदी संमेलनासाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळामध्ये निवड करण्यात आली आहे.
मॉरीशसमध्ये दि. 18 ते 20 ऑगस्ट 2018 या कालावधी दरम्यान 11वे जागतिक हिंदी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमलेनासाठी भारतातून जाणा-या शासकीय शिष्टमंडळामध्ये प्रा. चंद्रदेव कवडे यांची निवड करण्यात आली. विदेश मंत्रालयाने त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील प्रा. कवडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 20 विद्यार्थ्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेटची पदवी मिळविली असून 40 विद्यार्थ्यांनी एम.फील. केले आहे.प्रा. कवडे हे 2003 पासून हैद्राबाद स्थित हिंदी प्रचार सभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत.