जम्मू-काश्मीरच्या माजी मंत्र्याच्या भावाला राजस्थानात अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Arrest-1-2.jpg)
जम्मू (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूब मुफ्ती यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याबद्दल राजिंदर सिंह यांना पोलीसांनी राजस्थानात अटक केली आहे. राजिंदर सिंह हे जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते चौधरी लाल सिंह यांचे भाऊ आहेत. कठुआ सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल चौधरी लालसिंह यांना पदभ्रष्ट व्हावे लागले होते. कठुआ प्रकरणसंदर्भातच राजिंदर सिंहनी मेहबूबा मुफ्ती यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले होते आणि ते पोलीसांना वॉंटेड होते.
राजिंदर सिंह हे राजस्थानात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीसांच्या एका तुकडीने राजस्थान पोलीसांच्या सहकार्याने त्यांना जोधपूरमध्ये अटक केली.
मेहबूबा मुफ्ती यांच्याबद्दल अपशब्द उच्चारलेल्या भाषणाचा व्हिडियो राजिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर जारी केला होता. आपल्या मोटर कारच्या टपावर बसून एका रॅलीसमोर राजिंदर सिंह भाषण देतानाचा हा व्हिडियो होता. त्यांनी जमलेल्या लोकांना मेहबूबा मुफ्तींच्या विरोधात घोषणा द्यायला लावल्या होत्या.