जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार
![Young man shot dead by mob in Bibwewadi, Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/gun-shots.jpg)
जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेत्यांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळी देखील बडगाम जिल्ह्यातील एका भाजप नेत्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. अब्दुल हामीद नजर असे त्या भाजप नेत्याचे नाव असून भाजपचे बडगाम जिल्हा अध्यक्ष आहेत. नजर यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
गेल्या आठवडाभऱ्यात तीन भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. 6 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड ब्लॉकमधील वेस्सू गावचे सरपंच असलेले सज्जाद अहमद यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. सज्जाद हे कुलगाम विभागाचे भाजप उपाध्यक्षही होते. त्याआधी काझीगुंडमधीलच अखरन मीर या गावचे सरपंच अरीफ अहमद या सरपंचांवर गोळीबार केली होता. त्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी भाजपच्या शेख वसीम बारी यांची हत्या केली होती. बारी यांचे वडील आणि भाऊ यांचीही दहशवाद्यांनी हत्या केली होती.