Breaking-newsराष्ट्रिय
जम्मूमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, ३ जण जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Grenade-Attack.jpg)
श्रीनगर : जम्मू येथील बस स्थानकावर गुरुवारी उशीरा रात्री दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी थेट पोलीसांवर निशाणा साधला आहे. या ग्रेनेड हल्लात २ पोलिस कर्मचारी आणि १ नागरीक जखमी झाल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या हल्ल्यामळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा दलांनी हल्ल्याचा संपूर्ण भाग सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.