Breaking-newsआंतरराष्ट्रीय
जपानमधील बसचालकांच्या आंदोलनाची अशीही तऱ्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Japan-bus-.jpg)
ओकायामा : संप पुकारत त्याचा परिणाम कामावर होऊ न देण्याच्या जपानी कामगारांची विविध उदाहरणे दिली जातात. त्याची जगभर निश्चितच चर्चा होते. आताही जपानमधील एका बस कंपनीच्या चालकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या पद्धतीची जगभर चर्चा सुरू आहे.
स्थानिक वृत्तानुसार, जपानमधील ओकायामा शहरातील एका बस कंपनीच्या चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. संपाच्या नावाखाली या चालकांनी आपल्या बस आगारात उभ्या न करता त्या दिवस-रात्र चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला नुकसान होत असले, तरी स्थानिक प्रवाशांना मात्र या आंदोलनाचा फायदा होत आहे. कारण, हे चालक बस बंद न करता त्या चालवत तर आहेतच, मात्र प्रवाशांकडून ते भाडे घेत नाहीत. या अनोख्या आंदोलनाची जगभर जोरदार चर्चा सुरू आहे.