breaking-newsआंतरराष्टीय

जगभरात गेल्या 24 तासांत 1.24 लाख नवे कोरोना बाधित

जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे अख्खं जग हतबल झालं आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या आता 81 लाखांच्या पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 81 लाख 08 हजार 666 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 596 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41 लाख 96 हजार 614 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे.

कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा जास्त कहर ब्राझीलमध्ये दिसून येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button