breaking-newsराष्ट्रिय
छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव; मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार पुतळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/MAHARAJ-shivaji.jpg)
भोपाळ | महाईन्यूज
छिंदवाडा परिसरात असलेल्या सौंसर गावाजवळ बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावर कारवाई केल्याप्रकरणी अनेक वाद निर्माण झाले होते. शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर जेसीबीने कारवाई करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातही उमटलेले आहेत.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सौंसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्याची येईल असं सांगितले आहे. तर कमलनाथ यांचे चिरंजीव असलेले खासदार नकुलनाथ यांनी शिवाजी महाराज पुतळा बनवणे आणि त्याची स्थापना करणे यासाठी जो काही खर्च लागेल तो स्वखर्चातून करु अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर छिंदवाडामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवप्रेमींमध्ये जो राग होता तो शांत करण्यात मध्य प्रदेश सरकारला अखेर यश आलेलं आहे.