breaking-newsराष्ट्रिय

चिदंबरम आणि त्यांच्या पुत्राला तात्पुरता दिलासा

नवी दिल्ली – एअरसेल-मॅक्‍सिस मनि लॉड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 7 ऑगस्ट पर्यंत अटक करण्यास मज्जाव केला आहे. या प्रकरणात आपली संभाव्य अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी 30 मे रोजी कोर्टात अर्ज केला होता.

आपल्या प्रकरणाशी संबंधीत सर्व कागदपत्रे सरकारी पक्षाकडे असल्याने त्यांना आता माझ्याकडून मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही, त्यामुळे आपल्याला अटक करण्याची गरज नाही त्यामुळे आपल्याला अटकेपासून सुटका मिळावी अशी मागणी चिदंबरम यांनी कोर्टात अर्ज करून केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने त्यांना हा दिलासा दिला. कार्ती चिदंबरम यांनाही असाच दिलासा देण्यात आला असून त्यांना या आधीही दोन प्रकरणात अटकपुर्व जामीन मंजुर झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button