breaking-newsआंतरराष्टीय

चाईल्ड पोर्नोग्राफीचा आरोप, अमेरिकेत भारतीय वैमानिकावर विमानातच कारवाई

चाईल्ड पोर्नोग्राफी डाऊनलोड केल्याच्या आरोपावरुन सोमवारी अमेरिकेत भारतीय वैमानिकाला अटक करण्यात आली. वैमानिकाला विमानातच प्रवाशांसमोर बेडया घालण्यात आल्या. नवी दिल्लीहून निघालेले विमान सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर लँड होताच अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी यंत्रणेकडून अटकेची कारवाई करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

वयाच्या पन्नाशीत असलेला हा वैमानिक मुंबईतील असून भारतीय विमान कंपनीमध्ये प्रथम अधिकारी पदावर आहे. या वैमानिकाकडे अमेरिकेला जाणाऱ्या विमानांच्या संचलनाची जबाबदारी होती. सध्याच्या नियमानुसार ज्या हवाई कंपन्यांची विमाने अमेरिकेला जातात त्यांना उड्डाणानंतर १५ मिनिटांच्या आत प्रवासी आणि क्रू ची सर्व माहिती अमेरिकेच्या ब्युरो ऑफ कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनला द्यावी लागते.

एफबीआय एजंटसनी या वैमानिकाची अमेरिकेत येण्याची वाट पाहिली. अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर त्याला अटक करुन त्याचा पासपोर्ट जप्त केला. त्याचा अमेरिकेचा व्हिसा रद्द केला. त्यानंतर त्याला दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसवून पाठवून दिले अशी माहिती सूत्रांनी दिली. आता या वैमानिकाला पुन्हा अमेरिकेला जात येणार नाही.

या वैमानिकावर चाईल्ड पोर्नोग्राफी डाऊनलोड करण्याचा संशय असल्यामुळे मागच्या दोन महिन्यांपासून एफबीआयचे एजंटस त्याच्यावर पाळत ठेऊन होते. अमेरिकेत हॉटेलमधल्या वास्तव्यात हा वैमानिक इंटरनेटचा वापर कसा करतो त्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. एफबीआयने त्याआधारे पुरावे गोळा केले. एफबीआयने भक्कम पुराव्यांची फाईलच भारतीय यंत्रणेला पाठवून दिली होती असे सूत्रांनी सांगितले. व्हिसाच्या कारणांमुळे वैमानिकाला परत पाठवून दिले असे एअर लाइनच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button