चहावाल्याचं मोदीप्रेम, अंगावर चित्र काढून व्यक्त केल्या भावना!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Tea-Seller.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत विजय संपादन केला. आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित रहणार आहेत. अशात बिहारमधल्या मुजफ्फरपूरचा एक चहावालाही दिल्लीत दाखल झाला आहे. हा चहावाला मोदींचा समर्थक आहे. त्याने आपल्या अंगावर तिरंगा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र रंगवत आपला आदर आणि प्रेम व्यक्त केलं आहे. मी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये वास्तव्य करतो तिथे मी चहा विकतो. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहाण्यासाठी दिल्लीत आलो आहे. शपथविधी सोहळ्याजवळ चहा विकणार आहे आणि त्यांचा शपथविधी पार पडला की परतणार आहे असंही या चहावाल्याने म्हटलं आहे.
मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सहा हजार पाहुण्याची उपस्थिती आहे. बिहारमधल्या मुजफ्फरपूरचा हा चहावाला खास या शपथविधीसाठी दिल्लीत दाखल झाला आहे. त्याने त्याच्या अंगावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र काढलं आहे. शपथविधी सोहळा संपला की हा चहावाला परत जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. आता त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांचीही उपस्थिती असणार आहे. बिहारहून आलेल्या चहावाल्याची लक्षवेधी ठरते आहे. अशोक असं या चहावाल्याचं नाव आहे असंही समजतं आहे