breaking-newsराष्ट्रिय

चक्क रस्त्यावर आढळली ईव्हीएम मशीन, दोन अधिकारी निलंबित

राजस्थानमध्ये शुक्रवारी (दि. 7) विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये कैद झालंय. मात्र, येथे निवडणूक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. राजस्थानमधील किशनगंज विधानसभा मतदानसंघात शाहबाद परिसरात चक्क रस्त्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या हे ईव्हीएम मशीन किशनगंज येथे स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे.

Embedded video

ANI

@ANI

: A ballot unit was found lying on road in Shahabad area of Kishanganj Assembly Constituency in Baran district of Rajasthan yesterday. Two officials have been suspended on grounds of negligence.

505 people are talking about this

येथील गावकऱ्यांना शुक्रवारी रात्री मतदानानंतर शाहबाद परिसरातील मुगावली रोडवर एक ईव्हीएम मशीन बेवारस अवस्थेत आढळली. त्यांनी या प्रकरणाची माहिती प्रशासनाला देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मशिन ताब्यात घेतली. त्यानंतर पुढील कारवाई आणि चौकशीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने दोन सबंधित अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. अब्दुल रफिक आणि नवल सिंह अशी निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. मात्र, या प्रकारामुळे ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत आणि गोपनीयतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेत.

ANI

@ANI

Two officials have been suspended in connection with the incident where a ballot unit was found lying on road in Shahabad area of Kishanganj Assembly Constituency in Baran district of Rajasthan.

31 people are talking about this

राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यावेळी राजस्थानात ७२.७ टक्के मतदान झाले. येत्या ११ तारखेला निवडणुकीचा निकाल येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button