breaking-newsआंतरराष्टीय

ग्वाटेमाला ज्वालामुखी विस्फोटाने घेतले 99 बळी

ग्वाटेमाला सिटी : ग्वाटेमालाच्या फ्यूगो ज्वालामुखी विस्फोटामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत सुमारे 99 जणांना जीव गमवावा लागला असून 200 हून अधिक बेपत्ता आहेत. प्रभावित क्षेत्रातून सुमारे 12000 जणांना अन्यत्र हलवण्यात आले.

ग्वाटेमालाची फॉरेन्सिक एजेन्सी इनअसिफने फ्यूगो ज्वालामुखी स्फोटामुळे सुमारे 99 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतांपैकी अनेकांची ओळख पटू न शकल्याने डीएनए चाचणी आणि अन्य प्रक्रियांची गरज भासणार असल्याचे सांगण्यात आले.

ज्वालामुखी विस्फोटानंतर बाहेर पडलेल्याने लाव्हारसाने होरपळून मेले किंवा विषारी वायूमुळे त्यांचा श्वास कोंडला असावा असे मानले जात आहे. डोंगराळ गावांमध्ये मृतदेहांचा शोध घेण्याचे काम तेथील भौगोलिक स्थिती तसेच ज्वालामुखीतून बाहेर पडणारी तप्त माती, दगडांचे तुकडे आणि राखेमुळे मंदगतीने सुरू आहे. जोपर्यंत अखेरचा पीडित मिळत नाही तोवर शोधमोहीम सुरूच राहिल, परंतु नेमके कितीजण बेपत्ता आहेत हे माहित नसल्याचे विधान आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख सर्गियो कबानास यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button