गोवा – ब्रिटीश तरुणी स्कारलेट हत्या प्रकरण, आरोपीला १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Goa-Scarlett.jpg)
गोव्यातील ब्रिटीश तरुणी स्कारलेट हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपी सॅमसन डिसुझा याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने यावेळी दुसरा आरोपी प्लासादो कार्व्हालो याची निर्दोष मुक्तता केली आहे. मुलांसबंधीच्या खटल्यांचं कामकाज पाहणाऱ्या गोवा न्यायालयाने गतवर्षी दोघांची सुटका केली होती. यानंतर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर कोर्टाने या सॅमसन डिसूझा याला दोषी ठरवलं.
काय आहे प्रकरण –
२००८ रोजी गोव्यातील अंजुना बीचवर स्कारलेट मृतावस्थेत आढळली होती. तिच्या शरिरावर अनेक जखमांच्या खुणाही होत्या. सॅमसन डिसुझा आणि प्लासादो कार्व्हालो या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप होता. स्कारलेट ब्रिटीश नागरिक असल्याने आंतरराष्ट्रीय मीडियाने या घटनेची दखल घेतली होती.
गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. मात्र स्कारलेटच्या आईने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गोवा सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.