breaking-newsराष्ट्रिय

गरम सांबारमध्ये पडून 18 महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

गरम सांबार भरलेल्या भांड्यात पडून 18 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सांबार गरम असल्याने चिमुरडी भाजली गेली होती. उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूमधील मन्नाडी येथील स्ट्रिंजर्स स्ट्रिवर ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी आपली आई सुर्यासोबत राहत होती. एक वर्षापूर्वी सुर्या आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. पोट भरण्यासाठी सुर्या लोकांना डबे पोहोचवण्याचं काम करत होती.

शनिवारी सकाळी 10.30 वाजता सुर्या सांबार बनवत होती त्यावेळीच ही घटना घडली. सुर्या घराबाहेर गेली असता तिला मुलगी ओरडत असल्याचं ऐकलं. धावत येऊन पाहिलं असता मुलीच्या अंगावर गरम सांबार सांडलं असल्याचं तिने पाहिलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

चिमुरडीला किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सुर्याने गरम सांबाराचं भांडं तसंच जमिनीवर सोडलं होतं. चिमुरडी तेथे खेळत असताना तोल गेला आणि सांबारात जाऊन पडली’.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, चिमुरडील 51 टक्के भाजली होती. चिमुरडीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button