खोट्या बातम्या देणारी मीडिया देशाची सर्वात मोठी दुश्मन – डोनाल्ड ट्रम्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/trump-1-6-3.jpg)
वॉशिंग़्टन (अमेरिका) – खोट्या बातम्या देणारी मीडिया देशाची सर्वात मोठी दुष्मन असल्याचे ट्विट संतप्त डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा कोम जोंग उन याच्याबरोबरच्या यशस्वी शिखर परिषदेहून वॉशिंग्टनला परत आल्यानंतर काही तासातच ट्रम्प यांनी असे ट्विट केले आहे. सिंगापूर शिखर परिषदेचा वृत्तांत योग्य प्रकारे न दिल्याबद्दल ट्रम्प यांनी मीडियावर ट्विटद्वारे आगपाखड केली आहे.
अमेरिकन मीडिया, विशेष करून एनबीसी आणि सीएनएन उत्तर कोरियाबरोबर झालेला कराराचे महत्त्व कमी करून दाखवण्यासाठी कसून प्रयत्न करत असल्याचे ट्विटमध्ये करत असताना 500 दिवसांपूर्वी जणू काही आता युद्ध सुरू होणारा आहे, अशा थाटात हीच मीडिया उत्तर कोरियाबरोबर समझोता करावा म्हणून टाहो फोडत होती, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनात वैज्ञानिक तज्ज्ञांचा अभाव असल्याच्या आणि कॅनडातील आंतरराष्ट्रीय संमेलानात ट्रम्प यांनी अमेरिकन मीडियाच्या प्रामाणिकपणावर संशय घेतल्याच्या न्यूयॉर्क टाईम्समधील बातमीनंतर ट्रम्प यांचे हे ट्विट आले आहे.