breaking-newsपश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूरच्या कागल येथील कोविड सेंटरमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना
कोल्हापूर – कोल्हापूरच्या कागल येथील कोविड सेंटरमध्ये काल शनिवारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीची प्रतिष्ठापना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्ह्यात नवीन शंभर बेडचे नवे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटनही हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
‘कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना हे राज्यातील पहिलेच उदाहरण असावे, असा दावा यावेळी मुश्रीफ यांनी केला. त्यासोबतच विघ्नहर्त्याकडे त्यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर कर’, अशी प्रार्थनाही केली.