breaking-newsराष्ट्रिय
कोलकाता मेट्रोमध्ये बाँबची अफवा
कोलकाता – कोलकाता मेट्रो मध्ये बाँबच्या अफवेने आज प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. रविंद्र सदन स्थानकात एका सरकत्या जीन्या जवळ कॅन पडलेला आढळला तो बॉंब असल्याच्या संशयाने प्रवाशांची धावपळ उडाली. तथापी त्याचा मेट्रो रेल्वेच्या वाहतूकीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.
पोलिसांनी बॉंबशोधक पथक बोलावून त्या कॅनची तपासणी सुरू केली. पण त्यात नेमके काय आहे याचा शोध अजून लागेला नाही. या घटनेत कोणताही स्फोट किंवा घातपात झाला नाही त्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. पथकाने तो कॅन ताब्यात घेतला असून तो पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेण्यात आला आहे.