breaking-news

कोरोना संशयित रुग्ण मेडिकलमध्ये दाखल

नागपूर | महाईन्यूज

चीनसह सर्वच ठिकाणी दहशत माजविलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही प्रवेश केला आहे. केरळमध्ये या विषाणूच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, नागपुरातील मेडिकलमध्ये पहिल्या संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहे. मेडिकलने या रोगाच्या संशयित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. २५ मध्ये सात खाटा राखीव ठेवल्या आहेत.
कोरोना व्हायरस सध्या जगात सर्वत्र चर्चेत आहे.

चीनमधील वूआंग प्रांतात गेल्या काही आठवड्यांमध्ये हा साधारण विषाणू अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. याच देशात २७ डिसेंबर रोजी नागपुरातील जरीपटका येथील ३५ वर्षीय युवक व्यवसायासाठी गेला. हा युवक ६ जानेवारीला भारतात परतला. नागपुरात त्याला २७ जानेवारीपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. कोरोना व्हायरस तर नसावा या शंकेपोटी पुणे आरोग्य विभागाला स्वत:च्या आरोग्याची माहिती दिली. संबंधित विभागाने नागपूरच्या आरोग्य विभागाला सूचना केल्या. येथील उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी तातडीने रुग्णाशी संपर्क साधला. मेडिकल प्रशासनाने गुरुवारी वॉर्ड क्र. २५ मध्ये दाखल करून घेतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button