breaking-newsराष्ट्रिय

कोरोना लसीसाठी भारत- रशियात चर्चा सुरु

नवी दिल्ली : रशियाकडून विकसित करण्यात आलेली कोविड 19 वरील लस Sputnik V संदर्भात भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांमध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरु असल्याची बाब समोर येत आहे. केंद्रानंच मंगळवारी याबाबतची माहिती दिली. सध्याच्या घडीला या संदर्भातील प्राथमिक माहिती समोर आली आहे. गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीनं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या साथीनं लस तयार केल्याचं कळत आहे. ११ ऑगस्टला ही लस अधिकृतपणे नोंदवण्यात आली.

एका पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी याबाबतची माहिती देत लिहिलं, स्पुटनिक v बाबत सांगावं तर, भारत आणि रशियामध्ये यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत. याबाबतची प्राथमिक माहिती समोर आली असून, अधिक विस्तृत माहितीची प्रतीक्षा आहे. यादरम्यानच भारतात तीन लसींची चाचणी प्रगतीपथावर आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये रशियन लसीची बरीच चर्चा सुरु आहे. या प्रक्रियेमध्ये सप्टेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर लसीच्या उत्पादनास सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button