breaking-newsराष्ट्रिय

कोझिकोड दुर्घटना बचाव पथकातील २० अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

केरळ – कोझिकोड येथील विमान दुर्घटनेच्या मदतकार्य पथकातील २० अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हे अधिकारी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीही होम क्वॉरंटाईन झाले असून आज स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांचे सहकारी के. सुरेंद्रन यांनी आज ध्वजारोहण केले. विमान दुर्घटनेतील बचाव पथकातील ६०० जणांनाही यामुळे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे

“दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याशिवाय, आणखी एक प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. खबरदारी म्हणून त्या सर्व जवानांना वेगळं ठेवण्यात आलं आहे, जे दुर्घटनास्थळी प्रवाशांच्या मदतीसाठी उपस्थित होते”, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

कोझिकोड विमान अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांपैकी ९२ जणांची प्रकृती ठीक झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या विमान दुर्घटनेतील बचाव पथकातील ज्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यात मलप्पुरमचे जिल्हाधिकारी, साहाय्यक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर काही अधिकारी यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री व इतर मंत्रीही होम क्वॉरंटाईन झाले आहेत.

गेल्या आठवड्यात केरळच्या वंदे भारत मिशनअंतर्गत दुबईहून येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाची अपघात झाला. हे विमान कोरोनामुळे दुबईत अडकलेल्या लोकांना भारतात परत आणत होतं.

दुर्घटनेवेळी विमानात 190 प्रवासी होते. लँडिंग करताना हा विमान रनवेवरुन घसरला त्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button