breaking-newsराष्ट्रिय

‘कॉलरवाली’ झाली आठव्यांदा आई, बछड्यांची एकूण संख्या ३०

मध्य प्रदेशमधील पेंच व्यघ्र प्रकल्पामधील ‘कॉलरवाली’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिली आहे. तिचे हे आठवे बाळांतपण असून आता तिच्या बछड्यांची एकूण संख्या तब्बल ३० इतकी झाली आहे. याआधी मध्य प्रदेशमधील व्यघ्र प्रकल्पांमधील कोणत्याही वाघिणीने आत्तापर्यंत इतक्या बछड्यांना जन्म दिलेला नाही. मागील काही महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये २८ वाघांचा मृत्यू झाला असताना या नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे प्रकल्पामधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गळ्यामधील रेडीओ कॉलरमुळे पर्यटकांनीच या वाघिणीचे नामकरण ‘कॉलरवाली’ असं केलं आहे. काही पर्यटकांनी या वाघिणीला जंगलामध्ये तिच्या चार बछड्यांबरोबर पाहिले आहे. हे चारही बछडे लहान असले तरी ते तंदरुस्त असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. ‘कॉलरवाली’ला ‘पेंचची राणी’ तसेच ‘पेंचची राजकन्या’ या नावानेही ओळखले जाते. पेंचमधील जगप्रसिद्ध ‘बारीमदा’ वाघीण ही ‘कॉलरवाली’ची आई आहे. बीबीसी नेटवर्कने तयार केलेल्या ‘स्पाय इन द जंगल’ या डॉक्युमेन्ट्रीमध्ये ‘बारीमदा’ वाघीण झळकली होती. ‘कॉलरवाली’ने पहिल्यांदा मे २००८ साली तीन बछड्यांना जन्म दिला होता. मात्र त्यावेळेच्या उष्ण तापमानामध्ये तिन्ही बछड्यांचा न्युमोनियामुळे जन्मानंतर २४ तासांच्या आत मृत्यू झाला होता अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर तिने ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा चार बछड्यांना जन्म दिला. यापैकी तीन वाघ तर एक वाघीण होती. हे चारही बछडे वाचले. त्यानंतर २००८ ते २०१३ या पाच वर्षांमध्ये ‘कॉलरवाली’ने एकूण १८ बछड्यांना जन्म दिला त्यापैकी १४ बछडे वाचले. तर २०१५ च्या शेवटी तिने आपल्या सहाव्या बाळांपतणामध्ये चार बछड्यांना जन्म दिला. पेंचमध्ये सध्या ६० हून अधिक वाघांचा अधिवास आहे. येथील काही वाघांना पन्ना अभयारण्यामध्ये हलवण्यात आले आहे. पन्ना अभयारण्यामध्ये २५ मोठे वाघ आहेत.

‘हे ‘कॉलरवाली’ वाघिणीचे आठवे बाळांतपण आहे. तिचा जन्म २००४-०५ साली झाला असून १५ वर्षांच्या कालावधीमध्ये तीने अनेकदा ३-४ बछड्यांना जन्म दिला आहे. तिच्या मार्फत या व्याघ्र प्रकल्पामध्ये जन्माला आलेल्या वाघांची संख्या मोजायची झाल्यास ती ५० इतकी असेल. या सर्वाचे श्रेय हे अभयारण्य संभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाते’ असे मत अभयारण्यामधील अधिकारी असणाऱ्या डॉ. आर. जी. सोनी यांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button