breaking-newsआंतरराष्टीय

कॉर्नस्टार्चचा प्लास्टिकला पर्याय

घरपोच अन्नपदार्थ पार्सल देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी स्टीलच्या डब्यांचा पर्याय स्वीकारला असतानाच कॉर्नस्टार्चपासून बनवण्यात आलेल्या पर्यावरण पूरक वस्तूही बाजारात दाखल झाल्या आहेत.

कॉर्नस्टार्चपासून बनवलेले अन्नपदार्थ पार्सल देण्यायोग्य डबे, ग्लास, काटे, चमचे, स्ट्रॉ, वाटय़ा, कप्प्याचे ताट असे अनेक पर्याय विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. मात्र त्यांच्या मागणी आणि पुरवठय़ाचे प्रमाण व्यस्त असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. नरेंद्र कुलकर्णी हे कॉर्नस्टार्चपासून बनवलेल्या वस्तूंचे विक्रेते आहेत. कॉर्नस्टार्च या पदार्थाचे पूर्णपणे विघटन शक्य असल्याने या वस्तू पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या आहेत. मात्र प्लास्टिक बंदीनंतर आलेल्या मोठय़ा मागणीमुळे उत्पादकांकडून आमच्यापर्यंत त्या पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे तातडीने त्या ग्राहकांना देणे अवघड असल्याचे नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

कॉर्नस्टार्चच्या वस्तू टिकाऊ आणि मजबूत आहेत. कॉर्नस्टार्च हा खाण्यायोग्य पदार्थ असल्याने त्यापासून बनवलेल्या डब्यात पदार्थ साठवणे आरोग्यासाठीही योग्य आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे प्रमाणपत्रही या उत्पादनांना लाभले आहे. सुमारे ७२ तास अन्नपदार्थ साठवण्याची क्षमता असलेल्या या वस्तू परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button