breaking-newsराष्ट्रिय

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होणार

नवी दिल्ली : ‘कोरोना’विरुद्ध भारताच्या लढ्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. भारताने फक्त देशातच ‘कोरोना’ रोखण्यासाठी मोठी पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण जगालाही मदत केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे पुढील अध्यक्ष असतील.

सध्या जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद भूषवतात. डॉ. हर्षवर्धन हे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडून 22 मे रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

194 देशांच्या जागतिक आरोग्य महासभेने मंगळवारी भारताला कार्यकारी मंडळावर नेमण्याच्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. भारत तीन वर्षांच्या मुदतीसाठी कार्यकारी मंडळावर निवडला जाईल, असा निर्णय WHO च्या आग्नेय आशिया समूहाने गेल्या वर्षी एकमताने घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button