breaking-newsआंतरराष्टीय
कॅलिफोर्नियामधील वणव्यात शेकडो घरे भस्मसात
लॉस एंजेलिस : कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडील भागात पसरलेल्या वणव्यामुळे शेकडो घरे आणि झाडे भस्मसात झाली आहेत. अग्निशामक दलाच्या 1000 हून अधिक जवानांनी या आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही. लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील सांता क्लॅरिटाजवळील हजारो रहिवाशांना सुरक्षेसाठी दूर जाणे भाग पडले आहे.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत वणव्याने वेढलेले क्षेत्र फक्त दहा टक्के होते पण अल्पावधीतच ही आग तब्ब्ल 1,618 हेक्टरवर पसरली. या आगीमुळे परिसरातील सर्व शाळा तसेच प्रमुख महामार्ग बंद ठेवावे लागले.
आदल्या दिवशी लागलेली आग पसरू लागल्यावर शुक्रवारी पहाटे नागरिकांना नवीन रिकाम्या जाण्याचे आदेश देण्यात आले. “सांता आना’ असे संबोधल्य जाणारे वारे ताशी 65 मैल वेगाने वाहू लागल्याने आग वेगाने पसरत आहे.