कुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
बंगळुरू : कर्नाटकात अखेर कॉंग्रेस आणि जेडीएस यांचे सरकार स्थापन होत आहे. जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तर काँग्रेसचे नेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नी चेन्नम्मा यांनी उपस्थिती लगावली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना शुभेच्छा दिल्या. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उपस्थिती आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती आहे तसेच अखिलेश यादव आणि मायावती यांनी हजेरी लावली.