breaking-newsराष्ट्रिय
कुणाच्या घरात घुसून आंदोलन कसे काय करू शकता? हायकोर्टाचा ‘आप’ला सवाल
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुम्ही कुणाच्याही घरी किंवा कार्यालयात घुसून आंदोलन कसे काय करू शकता? असा सवाल हायकोर्टाने आम आदमी पक्षाला विचारला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या निवासस्थानी सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात भाजपाचे आमदार वीजेंद्र गुप्ता यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने आपच्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.