…काय म्हणाल्या न्या. इंदु मल्होत्रा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/indu-malhotra2.jpg)
नवी दिल्ली – सबरीमला मंदिर प्रकरणाची सुनावणी ज्या पाच न्यायाधिशांच्या पीठापुढे सुरू होती त्यात न्या. इंदु मल्होत्रा या एकमेव महिला न्यायाधिशांनी मात्र महिलांवरील निर्बंधांची प्रथा कायम ठेवण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यांनी आपले स्वतंत्र निकालपत्र दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, केवळ देशातील सेक्युलर वातावरण कायम ठेवण्यासाठी वर्षानुवर्ष सुरू असलेली धार्मिक प्रथा रद्द करता येणार नाही. एखादी धार्मिक प्रथा भेदभाव करणारी भासत असली तरी त्या धार्मिक प्रथेत हस्तक्षेप करणे कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही.
धार्मिक बाबतीत सर्वच निर्णय केवळ तर्काला धरून लागू करता येणार नाहीत. या प्रकरणात दिला जाणारा निर्णय केवळ सबरीमला मंदिरापुता मर्यादित राहणार नाहीं तर त्याचे देशभरात विविध ठिकाणी व्यापक परिणाम होऊ शकतात असेही न्या. मल्होत्रा यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.