breaking-newsराष्ट्रिय

काटरेसॅट ३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

  • पृथ्वी निरीक्षण, हवामान नकाशे, पायाभूत विकास, लष्करी टेहळणीसाठी उपयोग’पीटीआय,  श्रीहरीकोटा 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी  काटरेसॅट ३ या उपग्रहाचे ढगाळ वातावरण असतानाही यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही सी ४७  या प्रक्षेपकाच्या मदतीने करण्यात आलेल्या उड्डाणात काटरेसॅट ३ उपग्रहाबरोबर अमेरिकेचे १३ नॅनो उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आले.

पृथ्वीचे प्रतिमा चित्रण तयार करण्याचे काम अधिक अचूकतेने करण्याचा उद्देश काटरेसॅट ३ उपग्रहातून  साध्य होणार आहे.  चांद्रयान २ मोहिमेच्या अपयशानंतर  इस्रोच्या चमूने नवी आव्हाने स्वीकारून ही काटरेसॅट ३ मोहीम यशस्वी केली आहे. या यशाबद्दल इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

पीएसएलव्ही सी-४७ या प्रक्षेपकाने सकाळी ९.२८ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून अवकाशात झेप घेतली. त्यानंतर अवघ्या सतरा मिनिटांत काटरेसॅट ३  उपग्रह ध्रुवीय सूर्य सापेक्ष कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. अमेरिकेचे नॅनो उपग्रह पुढील दहा मिनिटांत त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. काटरेसॅट-३ उपग्रह पृथ्वीपासून ५०९ किलोमीटर उंचीवर आहे. २०१९ मध्ये इस्रोने केलेले हे पाचवे प्रक्षेपण असून याआधी जुलै महिन्यात चांद्रयान-२ सोडण्यात आले होते. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, ‘आताचे उड्डाण हे मोठे यश असून त्यात काटरेसॅट ३ सह अमेरिकेचे  १३ नॅनो उपग्रह अपेक्षित कक्षेत अचूकपणे प्रस्थापित करण्यात आले. काटरेसॅट हा गुंतागुंतीचा  प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मार्च महिन्यापर्यंत आणखी १३ मोहिमा होणार असून त्यात सहा प्रक्षेपक व सात उपग्रह मोहिमांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button