breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसने देशाला दिला सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री!

दोन दिवस झालेली खलबतं आणि चर्चेनंतर अखेर मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. अद्याप त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नसली तरी त्यापूर्वीच त्यांनी श्रीमंतीच्या बाबतीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मागे टाकलं आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, कमलनाथ आता देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरणार आहेत.

या वृत्तानुसार, 2014 लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कमलनाथ यांनी आपल्याकडे एकूण 206 कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती दिली होती. या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर 5 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचंही म्हटलं आहे. कमलनाथ यांच्याकडे 2 कार असून यातील एक दिल्लीमध्ये नोंदणी असलेली अॅम्बेसडर क्लासिक कार आहे, तर एक मध्य प्रदेशची नंबर प्लेट असलेली सफारी स्टॉर्म एसयुव्ही आहे. या गाड्यांची एकूण किंमत 19 लाख रुपये सांगण्यात आलं आहे. यापूर्वी सप्टेंबर 2011 मध्ये 273 कोटी रुपये संपत्तीसह त्यांना देशातील सर्वात श्रीमंत कॅबिनेट मंत्री म्हणून घोषीत करण्यात आलं होतं.

त्यापूर्वी फेब्रुवारी 2018 च्या एडीआर अहवालानुसार(असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स) देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे एकूण 177 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू हे होते. खांडू यांच्याकडे 129.57 कोटी रुपयांची संपत्ती आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खांडू तिसऱ्या क्रमांकावर जातील. याशिवाय देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये अनुक्रमे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह ( 48.31 कोटी रुपये) आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (15.51 कोटी रुपये) आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button