काँग्रेसचा हात सोडत समाजवादी पक्ष हत्तीवर स्वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/akhilesh-mayavati10011101.jpg)
नवी दिल्ली – आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोदीसरकार विरोधात महाआघाडी उभारण्याच्या तयारीत आहे. परंतु, त्याआधीच काँग्रेसला मध्यप्रदेशमधून मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेसचा हात सोडत बहुजन समाज पक्षसोबत संसार थाटण्याचा निश्चय केला आहे.
यासंबंधी बोलताना समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव म्हणाले कि, राजकारणात कोणीच कोणाची वाट पाहत नाही. काँग्रेसने आगामी निवडणुकीत आघाडी करणार कि नाही याबद्दल अजूनही स्पष्टोक्ती दिली नाही. त्यामुळे आम्ही अजून वाट पाहू शकत नाही. म्हणून यापुढे आम्ही आघाडीत राहू शकत नाही. बहुजन समजा पक्षासोबतच्या आघाडीविषयी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, अद्यापही काहीही निश्चित झालेले नाही. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत.
दरम्यान, याआधीही बहुजन समाज पक्षाने काँग्रेसची साथ सोडली होती. शिवाय मध्यप्रदेश व छत्तीसगढसह अन्य पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे.