breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटक विधानसभा निवडणूक : जेडीएस ठरणार किंगमेकर

बंगळूरू : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जनता दल सेक्यूलर अर्थात जेडीएस हा पक्ष किंगमेकर ठरणार आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलानुसार १२२ ची मॅजिक फिगर गाठण्यात कोणत्याही पक्षाला यश आलेले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि काँग्रेसला देवेगौडा यांच्या पक्षाचा टेकू घ्यावा लागणार असल्याचे दिसत आहे.

विविध एक्झिट पोलनुसार जनता दल सेक्यूलर हा पक्ष किंगमेकर ठरण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली होती. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच एक्झिट पोलमधील अंदाज खरा ठरताना दिसून येते. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत कर्नाटकमधील २२२ जागांपैकी भाजपा ९५, काँग्रेस ७९, जनता दल सेक्यूलर ४१ आणि अन्य पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button