कर्नाटकात बस अपघातात ४ ठार, १० जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/kalburgi-6.jpg)
कलबुर्गी : कलबुर्गीमधील जेवार्गीजवळ आज सकाळच्या सुमारास कर्नाटक परिवहन महामंडळाच्या दोन बस समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात एका बसच्या चालकासह ४ जण जागीच ठार झाले. तर इतर १० प्रवासी गंभीर जखमी झाले.
कलबुर्गीहून देवनागरीच्या दिशेने जाणाऱ्या आणि सुरपूर येथून कलबुर्गीच्या दिशेने येणाऱ्या बसची बिदर-श्रीरंगपटणा महामार्गावरील जेवार्गी येथे समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. एका बसचा चालक आणि बसमधून प्रवास करणाऱ्या तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. १० प्रवासी जखमी झाले. तर दुसऱ्या बसचा चालक केबिनमध्ये अडकला होता. त्याला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
जीव वाचवण्यात यश आलं असलं तरी, त्याला पाय गमवावा लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच जेवार्गी परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. त्यांनी दोन्ही बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. जखमींना जेवार्गीमधील रुग्णालयात दाखल केलं. गंभीर जखमींना कलबुर्गीतील खासगी रुग्णालयांत हलवण्यात आलं आहे. दरम्यान, कलबुर्गी परिसरात सकाळपासूनच काही प्रमाणात पाऊस आणि धुके होते. त्यात बसचालकाला झोप येत असल्यानं समोरचं वाहन दिसलं नाही. त्यामुळे अपघात घडला असावा, असं सांगण्यात येत आहे.