breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर आता येदियुरप्पांनाही कोरोना झाला आहे.
“मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी तब्ब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील, त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करावे,” असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी केले आहे.