Breaking-news

कर्नाटकचा प्रचार दौरा अर्धवट सोडून योगी परतले युपीला

बंगळुरू – वादळ आणि अचानक आलेल्या पावसामुळे उत्तरप्रदेशात मोठे नुकसान झाले असून त्यातील दुर्घटनांमध्ये किमान 73 जणांचे तेथे बळी गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आपला कर्नाटकचा प्रचार दौरा अर्धवट सोडून उत्तरप्रदेशात परतण्यास निघाले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तेथील प्रचाराची मुख्य धुरा सोपवली होती. त्यानुसार ते कर्नाटकात शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी गेले होंते. तेथे त्यांच्या अनेक सभा आयोजित करण्यात आल्या होत्या परंतु वादळामुळे उत्तरप्रदेशात मोठी जीवित हानी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना आपला दौरा आटोपता घ्यावा लागला आहे.

काल वादळाची घटना घडल्यानंतरही योगी कर्नाटकच्या प्रचाराच्या दौऱ्यातच व्यस्त राहिल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनीही त्यांच्या वर या संबंधात टीका केली होती. नियोजित कार्यक्रमानुासर त्यांच्या शनिवार पर्यंत जाहीरसभा होणार होत्या पण त्यांनी हा सभा अर्धवट सोडून स्वत:च्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button