breaking-newsराष्ट्रिय
करुणानिधी यांच्या अंत्य यात्रेला सुरवात; मरीना बीचवर होणार अंत्यसंस्कार
चेन्नई- तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद पाच वेळा भूषवलेल्या एम करुणानिधी यांची प्राणज्योत मावळली. प्रदीर्घ आजारापणा मुळे करुणानिधी यांना मागील काही दिवसांपासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
९४ वर्षीय करुणानिधींनी सुरुवातीला एम जी रामचंद्रन तर नंतर जयललिता या मातब्बर राजकारण्यांशी दोन हात करत तब्ब्ल ६ दशक तामिळनाडूच्या राजकारणावर आपला दबदबा कायम ठेवला.
तमिळनाडू राजकारणातील खूप मोठे नाव, पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारविधी वरून मोठा वाद होता. हा वाद मिटला असून करुणानिधी यांच्यावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार होत आहेत.