एसबीआयने ऑस्ट्रेलियात सुरू केली शाखा
![RBI slaps Rs 1 crore fine on SBI](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/SBI.jpg)
भारतीय स्टेट बँकेनं(एसबीआय) मेलबर्नमध्ये आपली शाखा उघडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शाखा उघडणारी एसबीआय भारतातील पहिलीच बँक ठरली आहे. सोमवारी एका भव्य कार्यक्रमात व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्नमध्ये शाखेचा उद्धघाटन सोहळा पार पडला. व्हिक्टोरियामध्ये याआधी सिप्ला, सायरेन्ट, एचसीएल, इन्फोसिस, रॅमको, टीसीएस, महिंद्रा आणि झोमॅटो या भारतीय कंपनी कार्यरत आहेत.
व्हिक्टोरिया आणि भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध सुधारण्यास आमचं हे पाऊल भविष्यात मदत करेल, पुढील दहा वर्षांमध्ये याचा फायदा दिसून येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश कुमार खारा म्हणाले की, मेलबर्नच्या गतिमान आणि व्यवसायास अनुकूल असलेल्या ठिकाणी शाखा उघडल्याचा आम्हाला अभिमान आहे. पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही देशांचे संबंध आणखी घट्ट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.