एकट्या भारताचा चीनच्या ओबीओआरला विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/One-belt-one-road.jpg)
बिजींग – चीन मध्ये सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन परिषदेत उपस्थित असलेल्या आठ देशांपैकी केवळ एकट्या भारतानेच चीनच्या वनबेल्ट वन रोड प्रकल्पाला विरोध केला. चीनच्या या प्रकल्पाला आत्ता पर्यंत जगातील 80 देशांनी मान्यता दिली असून एकटा भारत या प्रकरणात वेगळा राहिला आहे. शांघाय परिषदेत भारत उपस्थित आहे. या परिषदेतील सर्व उपस्थित देशांनी चीनच्या या प्रकल्पाची पाठराखण केली. पण भारत यावेळी काय करणार या विषयी औत्स्युक्य होते पण भारताने आपली आधीचीच भूमिका कायम राखत ओबीओआरला विरोध केला.
चीनचा हा बेल्ट आणि रोड प्रकल्प पाकिस्तान व्याप्त काश्मीरातून जात असून भारताचा विरोध डावलून चीनने तेथे प्रत्यक्ष बांधकाम सुरूही केले आहे. त्यामुळे चीनचा भारताचा वन बेल्ट वन बेल्टला विरोध आहे.चीनचा हा प्रकल्प म्हणजे दक्षिणपुर्व अशिया, मध्य अशिया, आखात, अफ्रिका आणि युरोप या साऱ्या क्षेत्राला रस्ता आणि सागरी मार्गाने जोडण्याचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. जगातील 80 देशांनी या प्रकल्पात चीनला साथ द्यायचे कबुल केले असून त्या प्रमाणे त्यांनी त्यावर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. या प्रकल्पात भारताचाही सहभाग व्हावा यासाठी चीन प्रयत्नशील होता. पण भारताने मात्र त्यापासून दूरच राहणे पंसत केले आहे.