एअर स्ट्राईक केला की झाडं पाडण्यासाठी गेला होतात?-सिद्धू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Siddhu-1.jpg)
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचं गुणगान सगळया भारतीयांनी गायलं. सगळ्यांनाच या कारवाईचा अभिमान वाटला यात शंका नाही. मात्र या कारवाईवरून आता राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवा म्हणत पुरावे मागितले आहेत. तर दुसरीकडे नवजोत सिंग सिद्धु यांनी झाडं पाडण्यासाठी एअर स्ट्राईक केला का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईक अर्थात हवाई हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे. मात्र नवजोत सिंग सिद्धू यांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत भाजपाने झाडं पाडण्यासाठी एअर स्ट्राईक घडवून आणला का? असा खोचक प्रश्न विचारला आहे.
300 दहशतवादी मारले गेले, हो की नाही?
तुमचा एअर स्ट्राईक मागचा उद्देश काय होता? झाडं पाडणं? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बोलत आहात? असे प्रश्न विचारत सिद्धू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. लष्कराने, हवाई दलाने केलेल्या कारवाईचं राजकारण करणं थांबवा असाही सल्ला सिद्धू यांनी दिला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतरही पाकिस्तानशी चर्चा करा असं म्हणणाऱ्या सिद्धूंना चांगलेच ट्रोल व्हावे लागले. तर कपिल शर्मा शोमधूनही त्यांनी हकालपट्टी झाली. तरीही सिद्धू त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. एअर स्ट्राईक झाला तेव्हा त्यांनी हवाई दलाच्या कारवाईचं कौतुकही केलं. मात्र आता सरकारवर एअर स्ट्राईकवरून टीका केली आहे.