breaking-newsराष्ट्रिय

उत्तर प्रदेशात फुटपाथवर झोपलेल्यांना बसने चिरडलं, सात जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात बसने चिरडल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित देवदर्शनाहून परतत होते. यावेळी रस्त्याच्या शेजारी फुटपाथवर ते झोपले होते. यावेळी एका खासगी बसने त्यांना चिरडलं. या बसमध्ये वैष्णोदेवी येथून परतणारे भाविक प्रवास करत होते.

बुलंदशहर येथील गंगाघाट येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित उत्तर प्रदेशचे आहेत. गंगा नदीत स्नान केल्यानंतर नरोरा घाट येथून ते पुन्हा घऱी परतत होते. यावेळी ही दुर्घटना घडली. दरम्यान अपघातानंतर आरोपी चालक बेपत्ता आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button