उत्तराखंडच्या चार जिल्ह्यात ढगफुटी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/uttrakhand-6.jpg)
देहराडून : उत्तराखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी ढगफुटी झाली. टिहरी, उत्तरकाशी, पौडी आणि नैनीताल जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर उत्तराखंडची राजधानी देहराडूनमध्ये मुसळधार पाऊस झाला. ढगफुटीमुळे तेथिल स्थानिक नद्या व नाले दुधडी भरून वाहू लागले तसंच तेथिल घरांमध्येही पाणी शिरलं आहे. पादचारी मार्ग वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळे बद्रीनाथ हायवेही आठ तास बंद ठेवण्यात आला.
उत्तराखंडमधील बिघडलेलं वातावरण लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य हवामान केंद्राचे निर्देशक विक्रम सिंह यांच्या माहितीनुसार, देहराडून, उधमसिंहनगर, हरिद्वार आणि पौडी गढवालमध्ये 70 ते 80 किलोमीटर प्रती तास या वेगाने वारे वाहतील. उत्तराखंडाच्या डोंगराळ भागात तुफान पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविली आहे.