breaking-newsआंतरराष्टीय

इराणला भूकंपाचे तीव्र धक्के, १७० जखमी

इराकला लागून असलेल्या पश्चिम दिशेच्या सीमेवर इराणला रविवारी रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने किमान १७० लोक जखमी झाले आहेत. इराणचे आप्तकालीन यंत्रणेचे प्रमुख पीर हुसेन कोलीवंद यांनी माध्यमांना हे वृत्त दिले आहे.

अमेरिकन भूर्गीय सर्वेक्षणानुसार ६.३ रिश्टर स्केलचा हा धक्का बसला. केरमनशाह प्रांतातील सरपोल-ए-जहाब परिसरात हा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किमी आत होता. दरम्यान, इराक टीव्हीने याची खोली ५ किमी सांगितली आहे.

या भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. इराकची राजधानी बगदादपर्यंत याचा धक्का जाणवला. इराणमधील सात प्रांतांमध्ये याचा परिणाम दिसत असल्याचे फार्स या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

स्थानिक प्रशासनाने ६ मदत दलांना भूकंप झालेल्या परिसरात पाठवले आहे. याच परिसरात नोव्हेंबर २०१७ मध्ये भूकंपामुळे सुमारे ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button