breaking-newsआंतरराष्टीय

इथिओपिया विमान अपघातातील मृतांमध्ये भारतीय महिला अधिकाऱ्याचा समावेश

इथिओपिअन एअरलाइन्सच्या विमान अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या ४ वरुन ६ इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.

Dr. Harsh Vardhan

@drharshvardhan

My condolences to the families of four Indian nationals who have died in an unfortunate crash of Ethiopian Airlines.Sadly,a UNDP consultant attached to my ministry @moefcc Ms Shikha Garg,also died in the crash. My prayers for the departed souls. @IndiaInEthiopia @SushmaSwaraj

२८४ लोक याविषयी बोलत आहेत

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणाऱ्या इथिओपिअन एअरलाइन्सचे विमानाने उड्डाण घेताच ६ मिनिटांच्या आत अपघाग्रस्त झाले होते. यामध्ये सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका भारतीय कुटुंबातील ६ जणांचा समावेश आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

Sushma Swaraj

@SushmaSwaraj

Pls help me reach their families. @IndiaInEthiopia

Sushma Swaraj

@SushmaSwaraj

@IndiaInEthiopia has informed me that the deceased Indian nationals are Vaidya Pannagesh Bhaskar, Vaidya Hansin Annagesh, Nukavarapu Manisha and Shikha Garg. /2

७१८ लोक याविषयी बोलत आहेत

या विमान दुर्घटनेतील मृतांची नावेही स्वराज यांनी प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये वैद्य पन्नागर भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकारवारपू मनीषा आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबियांना सर्वप्रकारची मदत करण्याचे आदेश इथिओपियातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आले आहेत.

Sushma Swaraj

@SushmaSwaraj

I have spoken to son of Mr Vaidya in Toronto. I am shocked you hv lost 6 members of your family in air crash. My heartfelt condolences. I hv asked @IndiainKenya @IndiaInEthiopia to reach u immediately. They will provide help and assistance in respect of all your family members.

Hiral@switu1500
@SushmaSwaraj @IndiaInEthiopia यांना प्रत्युत्तर देत आहे

Hello, I am daughter in law of Vaidya family. Correct names are Pannagesh Bhaskar Vaidya and Hansini Pannagesh Vaidya. Also tried reaching 2 officers but no luck. Please reach us at +14377727702

३८५ लोक याविषयी बोलत आहेत

स्वराज यांनी मृतांच्या कुटुंबियांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, मी वैद्य यांच्या टोरंटोतील मुलाशी फोनवरुन चर्चा केली. मात्र, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील ६ व्यक्तींना गमावल्याचे कळताच आपल्याला खूपच दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इथिओपिया आणि केनयातील भारतीय दुतावासाशी संवाद साधत त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितले आहे.

Sushma Swaraj

@SushmaSwaraj

I am sorry to know about the unfortunate crash of Ethiopian Airlines plane ET 302. We have lost four Indian nationals in the air crash. I have asked Indian High Commissioner in Ethiopia to provide all help and assistance to the bereaved families. @IndiaInEthiopia

२,५९६ लोक याविषयी बोलत आहेत
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button