breaking-newsराष्ट्रिय

इंदूरमध्ये शिवसेनेचे माजी प्रमुख Ramesh Sahu यांची गोळ्या घालून हत्या; पोलिसांचा तपास सुरु

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये मंगळवारी रात्री साधारण 2 वाजता शिवसेना नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. माहितीनुसार, शिवसेना नेते रमेश साहू तेजाजी पोलीस स्टेशन परिसरातील उमरिखेडा येथे ढाबा चालवत होते. रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडलेली आहे. हा खून नक्की कोणी व का केला याचा अजून खुलासा झालेला नाही. सध्या मारेकरी पळून गेले आहेत आणि शिवसेना नेत्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे. मयत रमेश साहू हे मध्य प्रदेशमध्ये शिवसेनेचे प्रमुखही राहिले आहेत.

ढाब्याबाहेरील कर्मचार्‍यांनी ढाब्याच्या आत जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सकाळी ही घटना उघडकीस आलेली आहे. रमेश साहू विरोधात खुनाचे आरोप, जमीनीबाबत वाद यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत. इंदूरचे पोलिस महानिरीक्षक हरिनारायण चारी मिश्रा यांनी बुधवारी सांगितले की, साहू यांची ढाब्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यावेळी सामान विखुरलेले होते व चार ते पाच कामगार ढाब्यावर झोपले होते, पण कुणालाही गोळीचा आवाज ऐकू आला नाही. एक कुत्रा देखील आहे, परंतु तोही भुंकला नाही. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button